मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साता-याच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला दिली मंजूरी
यासंबंधीचे पत्रक आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हाती सुपूर्त केले.
सातारा हद्दवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रस्तावाला मंजूरी मिळावी गेल्या अनेक वर्षांपासून साता-याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendraraje Bhosale) सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या हद्दवाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करून या यास हिरवा कंदील दाखवला आहे. यासंबंधीचे पत्रक आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हाती सुपूर्त केले.
शिवेंद्रराजेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर हा हद्दवाढीचा प्रस्ताव आता टेबलवरच राहणार असे सातारकरांना वाटत होते. मात्र अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये आजही असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना आज यश आले आणि अजित पवार यांनी या हद्दवाढीच्या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी मिळवली. हा निर्णय साता-याच्या पुढील वाटचालीसाठी फार महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे. यामुळे साताऱ्याला महानगरपालिकेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच श्रीरामजन्मभूमी ट्रस्टला पत्र; राम मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींचे योगदान
सातारा जिल्ह्यातील सध्याची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे तर आणखी सव्वा लाख लोकसंख्येची भर आता सातारा शहराच्या हद्दवाढीत होणार आहे. त्यामुळे लवकरच सातारा नगरपालिका ही महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करेल असेच दिसत आहे. या हद्दवाढीमध्ये सातारा शहरालगत असलेला अजिंक्यताराही हद्दवाढीत आला असून या परिसरातील शाहूनगरचा त्रिशंकू भागही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर सातारा शहरालगतची असलेली मोठी शाहूपुरी ग्रामपंचायतही आता सातारा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे.