Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या; शिंदे गटातील अनेकांना मत्री होण्याची 100% खात्री, इच्छुकांचा दावा

दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनीही जोरदार दावा केला असून, आपण मंत्री होणार याची आपल्याला 100% खात्री असल्याचे म्हटले आहे.

Sanjay Shirsat, Santosh Bangar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा पाठिमागील काही दिवसांपासून जोर धरत आली आहे. सरकार सत्तेत येऊन आता वर्ष उलटले. तरीही मंत्रिमंडळविस्तार झालाच नाही. आता तर राज्य सरकारची मुदत संपायलाच काही महिने बाकी आहेत. तरीही मंत्रिमंडळविस्ताराचा पाळणा हालताना दिसत नाही. अर्थात नाही म्हणायला लवकरच विस्तार अशा बातम्या येतात. पण, त्या केवळ वावड्याच ठरताना दिसतात. अशात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अनेकांनी दावे मात्र जोरदार सुरु केले आहेत. मराठवाड्यातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनीही जोरदार दावा केला असून, आपण मंत्री होणार याची आपल्याला 100% खात्री असल्याचे म्हटले आहे.

आमदार संतोष बांगर यांनी पुढे पुस्तीही जोडली की, मराठवाड्यातील तुमच्यासारख्या नेत्यालाच आम्हाला मंत्री करायचे आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करु नका, असा शब्दच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपणास देण्यात आल्याचे बांगर यांनी म्हटले आहे. शिवसेना मेळाव्यात बोलताना बांगर यांनी ही विधाने केल्याचे समजते. त्यामुळे बांगर की शिरसाट याबातब राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Mumbai Rain Updates: पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वरळी येथील कोस्टल रोडला भेट देऊन पाहणी (Watch Video))

आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची तीव्र इच्छा आहे. ती त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांना संधी मिळेल, अशी चर्चा नेहमीच असते. मात्र, अद्यापपर्यंत तरी प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. दुसऱ्या बाजूला संतोष बांगर यांनी मात्र जोरदार दावा ठोकला आहे. त्यांनी हिंगोली येथील विश्रामगृहावर पार पडलेला शिवसेना मेळाव्यात बोलताना सांगितले की, मी आमदार आहे. पण, माज करुन चालत नाही. मीसुद्धा आपल्यापैकीच एक आहे. सर्वांना सन्मानाने वागवा. सर्वांना सोबत घेऊन जाऊ, असेही बांगर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केवळ संजय शिरसाट, अथवा संतोष बांगरच नव्हे तर शिंदे गटातील अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. अनेकांनी त्यासाठी देव पाण्यात ठेवले असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपणच मंत्री अशी भावना या आमदारांच्या मनात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तसा विश्वास वाटतो आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तारच झाला नसल्याने नेमकी संधी मिळणार तरी कोणाला? याबाबत उत्सुकता कायम आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय हे देखील गुलदस्त्यात आगे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif