CM Eknath Shinde On Renaming Aurangabad, Osmanabad: संभाजीनगर, धाराशीव नामांतरासाठी कायदेशीर कॅबिनेट घेऊन पुन्हा अधिकृत घोषणा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या पुन्हा कॅबिनेट घेऊन आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबाद चं नामांतर धाराशीव करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मध्ये औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर संभाजीनगर (Sanbhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) चं नामांतर धाराशीव (Dharashiv) करण्यात आलं होतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा हा निर्णय बेकायदेशीरपणे घेतलेल्या कॅबिनेट द्वारा घेतला असल्याचं सांगत स्थगित केला होता. पण आज एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या पुन्हा कॅबिनेट घेऊन आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबाद चं नामांतर धाराशीव करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती दिली आहे. औरंगाबादचा उच्चार संभाजीनगर असा बाळासाहेब ठाकरेंनी केला होता आणि आता तो सत्यात कायदेशीरपणे उतरणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे यांच्यासह मराठवाड्यातील एकूण 5 आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचं खच्चीकरण केले जात होते असं म्हणत नाईलाजातून वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं पुन्हा बोलून दाखवलं आहे. आता शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. आमदारांचं राजकीय नुकसान होणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Abdul Sattar on CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही- अब्दुल सत्तार .

मराठवाड्याला समुद्रात वाया जाणारं पाणी वळवू देणार अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शिंदे सरकार यांचं सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे पण ते चूकीचं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. घटनापीठासमोर त्याची लवकरच सुनावणी होईल आणि योग्य न्याय होईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.