CM Eknath Shinde: मुंबईच्या कायापालटासाठी खड्डे आणि झोपडपट्टीमुक्ती आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
'खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई' करुन मुंबईचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे. मेट्रोची सध्या 337 कि.मी. सुरु असलेली कामे पुढील चार वर्षात म्हणजे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आता पर्यतच्या राजकीय कार्कीदीतील कुठलाही शिवसेनाचा (Shiv Sena) मुख्यमंत्री असो सर्वप्रथम मुंबईचा विकास (Mumbai Development) करणे यांसाठी सरकार कटीबध्द असते. मुळात शिवसेनेचं जन्मस्थानचं मुंबई (Mumbai) म्हणून शिवसेनेचं राज्यात सरकार असल्यास मुंबईकरांनाही राज्य सरकार कडून मोठ्या अपेक्षा असतात. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आता शिवसेनेचा भाग नसले तरी त्यांच्यावर शिवसेनेचे संस्कार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताच्या योजनांसाठी ते कायमचं कटीबध्द असतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपनगरात चांगलीचं पकड आहे पण शिवसेनेतील बंडानंतर मुंबईकरांना विश्वासात घेणे हे शिंदे गटासाठी अधिक महत्वाचं ठरणार आहे. मुंबईसाठी अनेक नवनवीन योजना घेवून येत असल्याचं मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ग्लोबल सोल्युशन समिटमध्ये (Mumbai Metropolitan Region Global Solution Summit) बोलत होते.
मुंबईतील रस्ते (Roads), मुंबई मेट्रो (Mumbai Metro), झोपडपट्टी याबाबत अनेक आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (CM Eknath Shinde) दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबई महानगर क्षेत्रात विविध पायाभूत सुविधांची विकासात्मक कामे प्रगतीपथावर आहेत. 'खड्डेमुक्त आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई' करुन मुंबईचा कायापालट करण्यास शासन कटिबद्ध आहे. मेट्रोची सध्या 337 कि.मी. सुरु असलेली कामे पुढील चार वर्षात म्हणजे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (हे ही वाचा:- Chandrakant Patil On State Govt: शिंदे-फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे, मंत्री चंद्रकांत पाटीलांचे वक्तव्य)
रस्त्यांवरुन देशाची वेगळी ओळख निर्माण होते व तेथील विकासाची गती अधिक असते. आतापर्यत मुंबईतील शहरातील ४५० कि.मी. रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यासाठी निविदा काढण्यात आली असून उर्वरित ४५० कि.मी.च्या कामांची निविदा मार्च महिन्यात काढण्यात येणार आहे. तसेच धारावीचा पुनर्विकास, कोळी बांधवाच्या पुनर्विकासासह रोजगार यांवर राज्य सरकार कार्यरत असल्याची महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)