अनुसूचित जमातीच्या 22 योजनांचा लाभ आता धनगर समाजालाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हया महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

गेल्या कित्येक महिन्यांपासून धनगर समाजाच्या आरक्षणापासून अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात गदारोळ माजला होता. त्यावर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यात यापुढे धनगर समाजाला अनुसूचित जमातीला लागू असलेल्या 22 योजनांचा लाभ मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हया महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे धनगर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दर आठवड्याला घेण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रमाणे आजही ही बैठक पार पडली. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय होता तो धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलेली घोषणा ही समस्त धनगर समाजासाठी दिलासादायक होती. धनगर समाजाला देण्यात येणा-या या 22 योजनांमध्ये शिष्यवृत्तीसह शैक्षणिक योजना, भूमिहीनांना जमिनी तसेच घरकुल योजना आदि योजनांचा समावेश आहे.

हेही वाचा- धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही; पंकजा मुंडे यांचे वचन

त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.