Chitra Wagh: अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल (Watch Video)

त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Photo Credit- X

Chitra Wagh: अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेंनी केला होता. एवढचं नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे म्हंटले आहे. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला (Chitra Wagh On Anil Deshmukh)आहे. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे. त्याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे. त्याशिवाय, प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. (हेही वाचा:Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप; PA मार्फत पैसे घेतल्याचे पुरावे CBI ला दिल्याची माहिती )

चित्रा वाघ यांचे ट्वीट

चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, 'सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी.', असे त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, 'निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्यांची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का? याची आम्ही वाट पहातोय', असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यावर आपली भूमिका स्पष्ट करणार? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहे.

सचिन वाझे यांनी काय आरोप केले?

वाझे म्हणाले की, 'मी सगळे पुरावे दिले आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहीले आहे.' असे त्यांनी म्हटले. या आरोपानंतर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत', असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif