Mumbai Sindhudurg Flight Service: मुंबई-सिंधुदुर्ग नियमित प्रवासी विमानसेवा एक सप्टेंबरपासून होणार सुरु

चिपी विमानतळ (Chipi Airport) येत्या 1 सप्टेंबरपासून नियमीत प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या मुंबई ते सिंधुदुर्ग हावाई प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Representational Image (Photo credit: The Boeing Company/ Facebook)

Sindhudurg Airport कोकणवासीयांना गणपती उत्सवाच्या दरम्यान गोड बातमी मिळणार आहे. चिपी विमानतळ (Chipi Airport) येत्या 1 सप्टेंबरपासून नियमीत प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या मुंबई ते सिंधुदुर्ग हावाई प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीच ही माहिती दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

पाठिमागील अनेक दिवसांपासून चिपी विमानतळ नियमीत प्रवासी सेवेसाठी कधी खुले होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर कोकणवासियांना ही गोड बातमी मिळू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांना गणपती बाप्पा पावला अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. खरे तर या विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई सुरु झाली होती. मात्र काही कारणांमुळे ही सेवा पुन्हा खंडीत झाली. अनियमीत सेवा आता पुन्हा सुरळीत सुरु होणार आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, ही विमानसेवा सुरु करण्यापापत केंद्रीय केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यावर केंद्राने सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे आता सेवा प्रत्यक आठवड्याला सुरु असेल शिवा एअर अलांयन्स व इंडीगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमानसेवा सुरु करण्यात यावी, असे निर्देशही केंद्र सरकारने विमान कंपन्यांना दिल्याचे चव्हाण म्हणाले.

चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग विमानतळ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग शहराला सेवा देणारे देशांतर्गत विमानतळ आहे. विमानतळ विशेषतः चिपी-परुळे येथे, वेंगुर्ला तालुक्यातील, मालवणपासून अंदाजे 21 किलोमीटर (13 मैल) आणि सिंधुदुर्गपासून अंदाजे 31 किलोमीटर (19 मैल) अंतरावर आहे.