Chinchwad Bypoll 2023: चिंचवडमधून भाजपला टक्कर देण्यासाठी शरद पवार यांनी दिला तगडा उमेदवार, राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना तिकीट

महाविकासआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे रिंगणात उतरत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (7 फेब्रुवारी) घोषणा केली.

Nana Kate | (Photo Credit - Facebook)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly By-Election 2023) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा निकराचा सामना पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे (Nana Kate) रिंगणात उतरत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज (7 फेब्रुवारी) घोषणा केली. पिंपरी चंचवड मतदारसंघ खेचून आणण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवल्याची चर्चा आहे. या ठिकाणी भाजने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. अश्विनी या दिवंगत आमदार लक्ष्मण जगतपा यांच्या पत्नी आहेत.

काटे यांच्यामुळे कलाटे यांचा पत्ता कट

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कोणाला तिकीट देते याबातब मोठी उत्सुकता सुरुवातीपासूनच होती. मात्र, अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने निर्णय देत नाना काटे यांच्या नावावर शिकामोर्तब केले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या राहुल कलाटे यांच्यावर राष्ट्रवादी डाव लावून त्यांनाच तिकीट देणार अशीही चर्चा होती. मात्र, इच्छुकांची संख्या पाहता संभाव्य बंडखोरी टाळत राष्ट्रवादीने नाना काटे यांच्या पारड्यात आपले माप टाकले. (हेही वाचा,  Maharashtra By Elections BJP Candidates: लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूपश्चात पत्नी अश्विनी जगताप यांना BJP ची उमेदवारी ; पहा कसबा पेठ चा पोटनिवडणूकीचा उमेदवार कोण?)

अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे

अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मन जगताप यांच्या पत्नी आहेत. भाजपने जगताप यांच्या घरात तिकीट देत भावनीक खेळी केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनेही दांडगा लोकसंपर्क आणि लोकप्रियता असलेला उमेदवार नाना काटे यांच्या रुपात उतरवला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काट्याची टक्कर होणार हे निश्चित मानले जात आहे.

ट्विट

सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड अशा दोन्ही मतदासंघात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील होता. मात्र, त्याला यश न आल्याने भाजपने दोन्ही मतदारसंघात उमेदवार घोषीत केली. भाजप पाठोपाठ आता महाविकासआघाडीनेही उमेदवार घोषीत केले आहेत.