Amit Shah यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख मागणी

हा निधी महाराष्ट्राला लवकर मिळावा अशी मागणीच मुख्यमंत्र्यांनी या बैठकी केली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज देशभरातील नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CMUddhav Thackeray) हे देखील उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नक्षलवाद (Naxalism in Maharashtra) उच्चाटन करण्यासाठी आणि नक्षल प्रभावित प्रदेशांमध्ये विकास करण्यासाठी सुमारे 1200 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. हा निधी महाराष्ट्राला लवकर मिळावा अशी मागणीच मुख्यमंत्र्यांनी या बैठकी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत गृहमंत्र्यांसोमोर काही मुद्द्यांवर सादरीकरण केले. या वेळी महाराष्ट्रातील नक्षलवाद संपविण्यासाठी महाराष्ट्राला 1200 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रामुख्याने नक्षल प्रभावीत परिसरात शाळा उभारणे, संपर्कासाठी अधिकाधिक टॉवर उभे करणे, रस्ते, वीज यांसारख्या एक ना अनेक गोष्टींची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council: 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खोचक प्रतिक्रिया)

दरम्यान, इतक्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकीस केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी अनुपस्थित होत्या. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात या बैठकीदरम्यान, व्यक्तीगत मुद्द्यांवरही चर्चा होईल, असा कयास व्यक्त केला होता. महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांनीही उत्सुकता वाढवली होती. मात्र, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या व्यक्तीगत भेट अथवा चर्चा झाल्याचे कोणतेही वृत्त अद्यापपर्यंत तरी आले नाही.