Uddhav Thackeray: पालकांनो लहान मुलांना जपा! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेला इशारा
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात भंयकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच राज्यातील नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात आलेल्या कोरोना लाटेने संपूर्ण राज्यात हाहकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात भंयकर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच राज्यातील नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविड संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे देखील वाचा-नागपूर मधील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या कमिशनर ऑफिसला लागलेल्या आगीत कंप्युटर, फॉल सिलींगसह फर्निचर जळून खाक
महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 63 लाख 12 हजार 656 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.1 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 95 हजार 535 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालय व अंबड येथील उप जिल्हा रुग्णालय येथे भेट दिली.रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड,मेडिसिन अद्यावत ठेवणे,साफ सफाई करणेबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.