Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन आढावा बैठक घेतली.
अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) इशारा किनारपट्टील राज्यांना देण्यात आला आहे. याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शुक्रवार, 14 मे) ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात यावी. तसंच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावं अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. (अरबी समुद्रात येणाऱ्या Tauktae चक्रीवादळाचा नेमका मार्ग, वेग, ठिकाण कसे पाहाल?)
विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे. तसंच मनुष्यबळ आणि साधन सामुग्री तयार ठेवावी असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Weather Update: 15 ते 18 मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील चार दिवसांचा अंदाज)
CMO Maharashtra Tweet:
तोत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.