कोरेगाव-भीमा हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार, आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत : प्रकाश आंबेडकर

हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे

प्रकाश आंबेडकर (Photo Credits: PTI)

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भिमा चौकशी आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. कोरेगाव भीमा हिंसाचारात संभाजी भिडे हेच सूत्रधार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची चौकशी आयोगाने माहिती मागवावी अशी मागणी प्रकाशजींनी केली आहे. या हिंसाचारासाठी मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगासमोर बोलावून त्यांचे जबाब नोंदवावेत असे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर आपले मत नोंंदावताना, आयोगाला वाटले आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कोणत्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. मात्र तुर्तास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावणे योग्य ठरणार नसल्याचे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने मांडले आहे. हिंसाचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिव, गृहराज्यमंत्री, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार असून त्यांचे देखील जबाब घ्यावेत, अशी विनंती आंबेडकर यांनी चौकशी आयोगाला केली.

त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विश्वास नांगरे पाटील यांनी बिनसरकारी उच्च स्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. तरी याबाबत पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत सध्या तरी आयोगांनी आपली भूमिका स्पष्टपणे मंडळी आहे.