Samruddhi Expressway: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 26 मे रोजी नाशिकमध्ये होणार समृद्धी द्रुतगती मार्गाच्या शिर्डी-भारवीर भागाचे उद्घाटन
पुढील महिन्यात MSRDC भारवीर आणि इगतपुरी दरम्यानच्या पट्ट्यावरील बांधकाम पूर्ण करण्याची योजना आखत आहे.
Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते 26 मे रोजी नाशिकमध्ये होणार समृद्धी द्रुतगती मार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शिर्डी-भारवीर (Shirdi-Bharvir) भागाचे उद्घाटन केलं जाणार आहे. नाशिकजवळील शिर्डी ते भारवीर दरम्यान सुरू होणारा हा मार्ग मार्चपासून तयार झाला आहे. या भागात डोंगराळ भाग नाही, त्यामुळे वाहनांना ताशी 120 किमी वेगाने जाण्याची परवानगी असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अधिकाऱ्याने सांगितले की, एकदा हा भाग वाहतुकीसाठी खुला झाला की, तो भारवीर आणि ठाण्याजवळील सुमारे 101 किमीचा रस्ता जोडेल. पुढील महिन्यात MSRDC भारवीर आणि इगतपुरी दरम्यानच्या पट्ट्यावरील बांधकाम पूर्ण करण्याची योजना आखत आहे.
11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी आणि नागपूर दरम्यानच्या 520 किमीच्या पट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईला मध्य भारताशी जोडणारा संपूर्ण कॉरिडॉर महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जातो. (हेही वाचा - Mumbai Traffic Update: 1 जून पासून परेल टी टी फ्लायओव्हर वर दूचाकी, अवजड वाहनांसह बेस्ट बसला ही प्रवेशबंदी)
उद्घाटन झाल्यापासून महामार्गावर अनेक जीवघेणे अपघात -
नागपूर ते शिर्डी हा रस्ता हळूहळू वाहनचालकांमध्ये लोकप्रिय होत असला तरी जीवघेण्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी गेल्या आठवड्यात शेअर केलेल्या डेटानुसार, या महामार्गावर गेल्या चार महिन्यांपासून अनेक अपघात झाले आहेत. डिसेंबरमध्ये उद्घाटन झाल्यापासून 30 एप्रिलपर्यंत 358 अपघातांमध्ये 39 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.