Chhota Rajan Convicted: जया शेट्टी खून प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचा निकाल
त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Chhota Rajan Convicted: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई विशेष न्यायालयाने आज गुरुवारी गँगस्टर छोटा राजन (Chhota Rajan ) याला दोषी ठरवले आहे. जया शेट्टी खून प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2001 मध्ये मुंबईतील ग्रँट रोड येथे जया शेट्टी यांच्यावर छोटा राजनच्या गुंडांनी गोळ्या झाडल्या होत्या. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत खटल्यांसाठी विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी राजनवर ठपका ठेवला होता. (हेही वाचा:Gangster Chhota Rajan: गँगस्टर छोटा राजन याच्यासह तिंघांना दोन वर्षांची शिक्षा, पनवेल येथील बिल्डरला खंडणी मागितल्याचे प्रकरण )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जया शेट्टी या मध्य मुंबईतील गावदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून 50 कोटींच्या खंडणीची मागणी होत होती. खंडणी देण्यास नकार देत, जया शेट्टी यांनी पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षाही दिली होती. मात्र, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. 4 मे 2001 रोजी, जया शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.