Shiv Jayanti 2021 निमित्त छत्रपती सेनेने साकारले 8 फूटी टाक; वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असून शुक्रवार, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती कार्यक्रमात याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
शिव जयंती (Shiv Jayanti) निमित्त छत्रपती सेनेने तयार केलेले टाक विश्वविक्रमी ठरले आहेत. वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Wonder Book of Records) याची नोंद झाली असून शुक्रवार, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती कार्यक्रमात याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती सेनेतर्फे तयार होणाऱ्या वस्तूंचे विश्वविक्रम होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यापूर्वी छत्रपती सेनेने शिवजयंती निमित्त 2019 रोजी जिरेटोप तर 2020 रोजी भवानी तलवार तयार केली होती.
यंदा सहा फूट रुंद आणि आठ फूट उंच टाक तयार करण्यात आला आहे. भाजप खासदार उदयराजे भोसले यांच्या हस्ते या टाकचे अनावरण होणार होते. मात्र कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने शाळकरी मुलींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (Shiv Jayanti 2021 Date: 19 फेब्रुवारी दिवशी साजरी होणार शिवजयंती 2021; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व)
पहा व्हिडिओ:
टाक वैशिष्ट्यं:
हा टाक 70 किलोचा असून त्यासाठी 65 किलो पितळ, 5 किलो तांबे आणि 2 शीट प्लायवूडचा वापर करण्यात आला आहे. तिवंधा लेन येथील बाळकृष्ण संगमनेरकर, लक्ष्मण संगमनेरकर आणि गौरव संगमनेरकर यांनी हा टाक साकारला असून यासाठी तब्बल महिन्याभराचा कालावधी लागला आहे. दरम्यान, हा टाक विश्वविक्रमी ठरल्याने सर्व कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
तारखेनुसार, 19 फेब्रुवारी रोजी राज्यभर शिवजयंती साजरी केली जाईल. मात्र यंदा कोविड-19 प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून विशेष नियम लागू करण्यात आले असून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहनही केले आहे.