Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी 6 प्रमुख मागण्यांवर 11 वाजता राज्य सरकार आणि मराठा समन्वयक समितीची बैठक; खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती
मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजातील गोर गरीबांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्राधान्य असल्याने समन्वयकांनी देखील अहंकार बाजूला ठेवून सरकारशी चर्चा करावी. असे आवाहन आहे.
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केल्याने सध्या महाराष्ट्रातील लाखो तरूणांचे नुकसान होत आहे. दरम्यान या आरक्षण प्रश्नी 6 प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी (Sambhaji Chhatrapati) मुंबई मध्ये आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील 3 दिवसांपासून आमदार-खासदारांनी त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या 6 प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज (28 फेब्रुवारी) सरकार दरबारी राज्य सरकार आणि मराठा समन्वयक समितीमध्ये चर्चा होणार आहे.
खासदार संभाजीराजे यांनी आज दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आणि मराठा समन्वयक समितीमध्ये सकाळी 11 वाजता वर्षा बंगल्यावर एक बैठक होईल. मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजातील गोर गरीबांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्राधान्य असल्याने समन्वयकांनी देखील अहंकार बाजूला ठेवून सरकारशी चर्चा करावी. शक्य असल्यास तिथेच निर्णय घ्यावा किंवा आझाद मैदानावर येऊन माझ्याशी बोलून अंतिम निर्णय घ्यावा असं आवाहन खासदार संभाजीराजेंनी केले आहे. नक्की वाचा: 127th Constitution Amendment Bill: राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल.
खासदार संभाजी छत्रपती यांचे आवाहन
दरम्यान मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तत्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी, ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी, सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा, महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे. या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत.