Crime News: लग्नाळू तरुणाचा महिलांच्या अंतर्वस्त्रांवर डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपीला नागरिकांकडून चोप

संभाजीनगर परिसरात महिलाचे अंतवस्त्रे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसेंदिवस चोरी वाढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime | (File image)

Crime News: छत्रपती संभाजीनगर  (Chhatrapati Sambhaji Nagar) मधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई वडील लग्न करून देत नाही म्हणून आरोपी तरुणाने महिलांचे अंतवस्त्रे चोरले. परिसरात महिलांचे अंतवस्त्र चोरीचे प्रमाण वाढल्याने हा प्रकार समोर आला आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढल्याचे दिसून आले त्यामुळे स्थानिकांनी सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) लावला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने तरुणांला नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. पोलिसांना ही घटना स्थानिकांनी सांगितली. या कडे लक्ष देत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. महिलाचे अंतवस्त्रे चोरी होताच परिसरात खळबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. आई वडिल तरुणाचे लग्न करून देत नसल्याने महिलांचे अंतवस्त्रे चोरणारा विकृतपणा समोर आला आहे. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी या चोरा कडे लक्ष देवू होते. म्हणून तो हाती लागला आहे. महिलांचे अंतवस्त्रे बाहेर वाळत टाकले असताना हा चोर कपडे चोरून घेवून जावू लागला. सुरुवातीला महिलांनी दुर्लक्ष केले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला होता. सोसायटी वाल्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यामुळे हा प्रकार सर्वांसमोर आला आहे. सचिन सारंग दिंडोरे (वय १९,) वाळूज परिसरातील रहिवासी आहे.

तरुणांवर स्थानिकांनी लक्ष दिले. सीसीटीव्ही कॅमेरात तो कपडे चोरू करून घेवून जात असताना, तरुणांनी त्याचा पाठलाग केला. सीसीटीव्ही कॅमेरात त्याने विकृतपणा केला. हे लक्षात येताच स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. जवळच्या पोलिस ठाण्यात हा प्रकार स्थानिकांनी सांगितला आहे. लग्नाळू तरुणांचा हा प्रकार बघत पोलिस देखील चक्रावले आहे. महिलांचे अंतवस्त्रे चोरी होताच परिसरात खळबळ उडाली आहे.  चौकशी करताना समोर आले की, आई वडील लग्न करुन देत नसल्याने त्यांने हा विकृतपणा केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement