Chhagan Bhujbal Tests Positive For COVID-19: एनसीपी नेते, मंत्री छगन भुजबळ यांना कोविड 19 ची लागण
राज्यात एकूण 52956 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडी मधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि काळजी घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं होतं. दरम्यान काल त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळेस त्यांच्यासोबत एनसीपी अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. नाशिकमध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा.
महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीमधील आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, बच्चू कडू, एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
छगन भुजबळ ट्वीट
कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णाच्या पार्श्वभूमीवर भीती व्यक्त केली आहे. त्यांंनी जनतेला पुन्हा कोविड 19 नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केले आहे. तसेच लॉकडाऊन साठी पुढील 8 दिवसांचे अल्टिमेटल दिले आहे. नागरिकांनी नियमावलीचं पालन केल्यास लॉकडाऊन टाळता येऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काल 24 तासांमध्ये 6971 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याचं सांगण्यात आले आहे. राज्यात एकूण 52956 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.