Mumbai: अंधेरी कुर्ला रोड येथील चाळ कोसळली, बचावकार्य सुरु, तीन महिलांची सुटका

परिसरातील जूनी निवासी चाळ पूर्णपणे कोसळली. तळमजला आणि वरचा मजला असलेली चार ते पाच खोल्या असलेली चाळ कोसळली.

Building Collapsed प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI/Twitter)

Mumbai: मुंबईतील अंधेरी कुर्ला रोड येथील राधा नगरमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली. परिसरातील जूनी निवासी चाळ पूर्णपणे कोसळली. तळमजला आणि वरचा मजला असलेली चार ते पाच खोल्या असलेली चाळ कोसळली. पावसाळामुळे भूस्खलनाचा धोका उभ्दवल्याचे सांगत आहे. चाळ कोसळल्याने अनेक जण ढीगाऱ्याखाली अडकले होते. (हेही वाचा- हरिद्वारमध्ये यूपी रोडवेजची बस पुलावरून खाली कोसळली, अपघातात 20 हून अधिक प्रवासी जखमी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद दिला आणि बचाव कार्य सुरु झाले. ढिगाऱ्याखालून तीन महिलांची सुटका करण्यात आली अशी माहिती मिळली. त्या जखमी झाल्याने त्यांना साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आफरीन शेख (२५) यांच्यावर लोखंडी पत्रा पडला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेला दुखापत झाली.  रसिका नाडर (३२) यांच्यावर पाठीवर गंभीर जखमी झाली आहे तर आणखी एक महिला रुग्णालयात वैद्यकिय उपचार घेत आहे अशी माहिती डॉक्टर तस्मिया यांना माहिती दिली.

चाळी कशी कोसळली हे अद्याप समोर आले नाही. याचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी कार्य करत आहे. ही चाळ जुनी होती. अतिमुसळधार पावसामुळे चाळ कोसळली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. चाळ कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.