Chandryaan 2: नागपूर पोलिसांची विक्रम लॅन्डर कडे विनवणी, सिग्नल तोडण्यासाठी चलान घेणार नाही म्हणत केले हटके ट्विट

या पार्श्वभूमीवर आपल्या हटके शैलीत विक्रम लँडरला प्रतिसाद देण्याची विनंती करत नागपूर पोलिसांनी एक खास ट्विट केले आहे

Chandrayaan 2 Vikram Landing (Photo Credits: ISRO)

भारताची महत्वकांक्षी अंतराळ मोहीम चांद्रयान 2 (Chandrayaan 2)   ही अगदी शेवटच्या टप्प्यात यशस्वी होताहोता ऐन वेळी सिग्नल तुटल्याने अर्धवट राहिली. यांनतर इस्रोच्या वैज्ञानिकांसोबतच कोट्यवधी भारतीयांची सुद्धा निराशा झाली. अवघ्या 2.1 किमीवर चंद्रयांतील विक्रम लँडरशी (Vikram Lander) संपर्क तुटल्याने आतापर्यंतचे अथक परिश्रम आणि उत्सुकता पाण्यात गेल्याची भावना सर्वत्र पाहायला मिळत होती. पण इतक्यात, आज म्हणजेच सोमवारी 9 सप्टेंबर रोजी इस्रोतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरचे नेमके ठिकाण पुन्हा शोधण्यास यश आले आहे, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा विक्रमशी संपर्क करण्यासाठी वैज्ञानिकांना मदत झाल्याचे समजत आहे. साहजिकच यांनतर भारतीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या, अशातच नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) देखील आपल्या हटके शैलीत विक्रम लॅण्डर ला एक अनोखी विनवणी केली आहे. विक्रम लँडरला संबोधून नागपूर पोलिसांनी एक खास ट्विट केले, यामध्ये त्यांनी लँडरला पुन्हा संपर्कात येण्यासाठी विनंती केली आहे, विक्रम तू सिग्नल तोडलास म्हणून तुझ्याकडून चलान घेणार नाही पण तू परत ये अशा आशयाचे हे ट्विट आहे.

नागपूर पोलीस ट्विट

हे हटके आणि क्रिएटिव्ह ट्विट पाहताच नेटकऱ्यांमध्ये सुद्धा एकाप्रकारचा हशा पिकला. काहींनी आपल्या शैलीत या भावनेचे कौतुक केले तर काहींनी पोलिसांना टोला लगावला.

पहा काय म्हणतायत नेटकरी

दरम्यान, इस्रोच्या माहितीनुसार, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सापडला आहे, सुदैवाने पृष्ठभागावर आदळूनही लँडर सुरक्षित मात्र थोड्या तिरक्या स्थितीत आहे. विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्यास चांद्रयान 2 मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी होईल हे नक्की!