Chandrapur Road Accident: चंद्रपूरात भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, भीषण अपघातात चार जण दगावले

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident (PC - File Photo)

Chandrapur Road Accident:  महाराष्ट्रात चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात भरधाव ट्रक एका रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहे.  27 सप्टेंबर रोजी हा अपघात रात्री साडेसातच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  शहरातील बल्लारपूर परिसरात झाला. ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक भऱधाव घेत असताना नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला.

शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर बुधवारी रात्री हा अपघात झाला. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय 56 वर्षे, अनुष्का खेरकर (वय 22 वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय 49 वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत.

बल्लारपूर येथील अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपूलावरून एक भरधाव वेगात येत होता. भरधाव वेगात ट्रक चालकाचा गाडीवरील नियत्रंण सुटलं आणि ट्रक रिक्षावर उलटली. यात भीषण अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला. आणि रिक्षाचे चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटना स्थळी दाखल झाले. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद घेतली. या भीषण अपघाता मुळे रस्त्यावर  वाहतूक तासभर ठप्प राहिली होती.पोलीसांनी या अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.