नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान मोदी यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण, एकास अटक

दरम्यान, धोटे यांचे लिखाण आणि त्यांना झालेली अटक यावरुन शहरात काही काळ तणाव होता. धोटे यांनी यापूर्वीही आक्षेपार्ह लिखाण केल्याचे समजते.

Arrests | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्याबाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या आरोपाखाली ओबीसी नेते बळीराज धोटे (Baliraj Dhote) यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. बळीराज धोटे हे 'सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट'चे संयोगक आहेत. शहीद भगतसिंग यांच्याविरुद्ध चालवण्यात आलेल्या खटल्यात ब्रिटिशांची बाजू मांडणारा वकील सूर्यनारायण शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता, अशा आशयाची पोस्ट धोटे यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती. या पोस्टवर आक्षेप घेत भाजप (BJP) आयटी सेल कार्यकर्ता राहुल लांजेवार यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी धोटे यांना अटक केली.

चंद्रपूर पोलिसांनी बळीराज धोटे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 1 (iv)(सेक्शुअर हॅरेशमेंट), 505 (2) (सार्वजनीक शांतता भंग) तसेच, माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) कलम 67 (transmitting sexually explicit matter)अन्वये गुन्हा नोंद केला आहे. धोटे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी म्हटले आहे की, 'धोटे यांनी फेसबुक आणि व्हाट्सअॅप अशा दोन्ही ठिकाणी आक्षेपार्ह आणि अश्लिल लिखाण केले आहे. त्यांच्या पोस्टध्ये म्हटले आहे की, क्रांतीकारक भगत सिंह यांचे वकिलपत्र एका मुस्लिम व्यक्तिकडे होते. मात्र, एका हिंदू वकिलाने त्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. त्यांनी म्हटले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना चुकीच्या पद्धतीने फेसबुक पोस्टमध्ये सादर केले होते. ज्यामुळे शहर आणि परिसरात तणाव निर्माण झाला असता.'

भाजपच्या आयटी सेलने आमच्याकडे धोटे यांची तक्रार केली होती. आलेल्या तक्रारीत केलेल्या उल्लेखाची शहानिशा करत पोलिसांनी धोटे यांना अटक केल्याचेही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. (हेही वाचा, Video: मारक शक्तींचा वापर केल्यामुळे भाजप नेत्यांचा मृत्यू: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर)

दरम्यान, चंद्रपूर पोलिसांनी बळीराज धोटे यांना राहत्या घरातून रविवारी (25 ऑगस्ट 2019) पहाटे पाच वाजनेच्या सुमारास अटक केली. दरम्यान, धोटे यांचे लिखाण आणि त्यांना झालेली अटक यावरुन शहरात काही काळ तणाव होता. धोटे यांनी यापूर्वीही आक्षेपार्ह लिखाण केल्याचे समजते.