Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूरमध्ये पूजेच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा; दीडशे जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

अंदाजे पाचशेवर लोक या पूजेत सहभागी झाले होते.

Photo Credit-X

Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूरमध्ये जेवणातून नागरिकांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल दीडशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावातही घटना घडली. पूजेच्या जेवणातून नागरिकांना ही विषबाधा झाल्याचं समजत आहे. माजरी येथे काल नवसाची पूजा होती. यानिमित्त रात्री जेवण ठेवण्यात आले होते. अंदाजे पाचशेच्या वर लोकांनी या पूजेला हजेरी लावली होती. त्यातील जेवलेल्या काही लोकांना ही विषबधा झाली आहे. (हेही वाचा :Food Poison: लातूर आणि नागपूर जिल्ह्यात विषबाधा झाल्याने 200हून अधिक जणांची प्रकृती बिघडली, उपचार सुरु )

आधी शंभर नागरिकांना विषबाधा झालयाचं निष्पण झालं होतं. मात्र, त्यानंतर आकडा हा वाढत गेला. सुदैवाणे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या रूग्णालयांची परिस्थीती पाहिल्यास रूग्णालयेदेखील कमी पडू लागली आहेत. त्यामुळे काही जणांना भद्रावती आणि वरोरा येथे हलवण्यात आले. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समोर आले आहे.

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना बाहेरचे खाणे टाळावे. बाहेरच्या जेवणाच्या स्वच्छतेची आणि देखभालीची शक्यता कमी असते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif