Maharashtra Rain Forecast: ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

याशिवाय, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Weather | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Rain Forecast: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, शनिवारी, 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि राज्याच्या इतर भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील काही भागात पाणी साचले असून त्यामुळे नवरात्रोत्सवात अडथळा निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, अकोला जिल्ह्यांत गडगडाटी वादळासह यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव)

मुंबई हवामान अंदाज - 

तथापी, हवामान खात्याने आज मुंबईसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. आज शहरात पाऊस आणि गडगडाटी वादळाच्या शक्यतेसह अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान अंदाजे 27 अंश सेल्सिअस राहिल्याने तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दरम्यान, आज सायंकाळी 7:30 PM वाजता 2.85 मीटर उंचीपर्यंत भरती येणार आहे. तसेच दुसरी भरती 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:31 वाजता येईल, या लाटांची उंची 3.64 मीटरपर्यंत असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif