Chairman of Siddhivinayak Temple Trust Mumbai: सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता आमदार सदा सरवणकर!

त्यामुळे हे मंदिर मुंबईतील एक प्रमुख ओळखींपैकी एक आहेत.

Sada Sarvankar | (Photo Credits: Facebook)

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्याकडे होती. पण शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. शिंदे गट ठाकरे गट या फूटीनंतरही एकमेकांसमोर आले. यामध्येच मागील वर्षी सदा सरवणकर यांचे नाव गणेशविसर्जन मिरवणूकीमध्ये हवेत गोळीबार गेल्याच्या प्रकरणामध्येही आले होते. पण चौकशी मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली. आता त्यांच्याकडे सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

सदा सरवणकर हे शिंदे गटाचे माहिम दादर विधानसभेचे आमदार आहेत. मंत्रिपद हुकल्यानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल अशा चर्चा रंगत होत्या. त्यामध्ये आता सरवणकरांना बाप्पा पावला आहे. देशापरदेशातून प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाला भाविक गर्दी करतात. त्यामुळे हे मंदिर मुंबईतील एक प्रमुख ओळखींपैकी एक आहेत.

सदा सरवणकर यांनी यापूर्वी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष भूषवलं आहे. ठाकरेंच्या विश्वासातील जुन्या शिवसैनिकांपैकी एक म्हणून सरवणकरांकडे पाहिलं जात होतं. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून खुलेआम एकनाथ शिंदे यांचा निषेधही केला होता पण अचानक एका रात्री सारी गणितं फिरली आणि सरवणकर शिंदे गटात सहभागी झाले. नक्की वाचा: 'आमदारकीसाठी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं'- सदा सरवणकर यांचे खळबळजनक आरोप .

2004 मध्ये पहिल्यांदा सदा सरवणकर पहिल्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये सदा सरवणकरांऐवजी शिवसेनेने आदेश बांदेकरांना तिकीट दिले. नाराज सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाई विजयी झाले होते. 2012 मध्ये सरवणकरांची शिवसेने मध्ये 'घरवापसी' झाली होती.