Summer 2020 Special Trains: लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी, सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान मध्य रेल्वे कोकण मार्गावर चालवणार 4 समर स्पेशल ट्रेन्स, इथे पहा संपूर्ण वेळापत्रक
येत्या समर व्हेकेशनसाठी कोकणात जाण्याच्या प्लॅन करत असाल तर पहा मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि पनवेल ते करमाळी, सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान कोणत्या समर स्पेशल ट्रेन्स चालणार?
Summer 2020 Special Trains For Konkan and Goa: एप्रिल मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर सार्यांनाच उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागतात. कोकणाला अथांग समुद्राचे वरदान मिळाल्याने आता अनेक पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे कोकण, गोवा परिसरात समर व्हेकेशनसाठी फिरायला येणार्यांची मोठी गर्दी असते. अनेकजण आरामदायी प्रवासासाठी रेल्वे मार्गाने जाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे कोकणवासीय आणि पर्यटकांची हीच ओढ पाहता आता मध्य रेल्वेने कोकण आणि गोवा मध्ये जाणार्या पर्यटकांची संख्या पाहता काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या समर व्हेकेशनसाठी कोकणात जाण्याच्या प्लॅन करत असाल तर पहा मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि पनवेल ते करमाळी, सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान कोणत्या समर स्पेशल ट्रेन्स चालणार?
कोकणात जाण्यासाठी तिकीट बुकिंग 4 महिने आधीपासून सुरू होते. तर अवघ्या काही क्षणांमध्ये तिकीं हाऊसफुल्ल होतात त्यामुळे अनेकदा आता अगदी अयत्या वेळेस तुम्ही तिकीटांचं बुकिंग करणार असाल तर तुमच्यासाठी या स्पेशल ट्रेनचं बुकिंग करणं शक्य आहे. मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणार्या या नव्या समर स्पेशल ट्रेन्स विकली असून लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी - लोकमान्य टिळक टर्मिनल्स, पनवेल - करमाळी - पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनल्स - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनल्स अशा 4 स्पेशल ट्रेन्स चलवल्या जाणार आहेत. Holi 2020 Special Trains: होळी निमित्त कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे चालवणार पनवेल, मुंबई ते करमाळी स्थानकादरम्यान 20 विशेष ट्रेन्स.
उन्हाळा 2020 विशेष ट्रेन्स
मुंबई, नवी मुंबई मधून कोकणवासीय चाकरमनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावी काजू, आंबा, फणसावर ताव मारायला जातात. आता पर्यटन विभागाकडूनही कोकणाच्या अनेक समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स इतर अॅक्टिव्हिटी खेळण्यासाठी खास केंद्र सुरू केली आहेत. मात्र सुरक्षेची खबरदारी घेत अशा ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा सल्ला दिला जातो. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर होळी स्पेशल देखील काही गाड्यांची घोषणा केली आहे.