Matheran Train Service Time Table: माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सुरू; इथे पहा अमन लॉज - माथेरान दरम्यान शटल सेवेचं वेळापत्रक

सकाळ-दुपार प्रत्येकी 2 -2 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत.

Matheran Toy Train | Poto Credits: Twitter/ Central Railway

लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन आज (4 नोव्हेंबर) पासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. सकाळी अमन लॉज (Aman Lodge) ते माथेरान (Matheran) या दरम्यान मिनीट्रेन आता धावणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष नियमावली जारी करत ही शटल फेरी सुरू केली आहे. सकाळ-दुपार प्रत्येकी 2 -2 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. Pune: पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, डोंगरकड्यांवर ट्रेकिंगला परवानगी; काय आहेत अटी? घ्या जाणून.

सकाळी पहिली शटल सेवा माथेरान वरून 9.30 ला सुटेल तर अमन लॉज वर 9.48 ला पोहचणार आहे. तर शेवटची अमन लॉज-माथेरान ट्रेन ही 4.25 असेल. दरम्यान या ट्रेनमध्ये 3 सेकंड क्लास आणि एक फर्स्ट क्लास असे 6 डब्बे असतील.18 मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांनी मध्य रेल्वेने दिलेल्या नियमावलीचं पालन करणं गरजेचे आहे. दरम्यान मार्च महिन्यात जसा कोरोना फैलावू लागला होता तशी ही शटल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मध्ये रेल्वेने आता पर्यटकांसाठी ही माथेरानची मिनी ट्रेन देखील 22 मार्च नंतर पहिल्यांदाच खुली केली आहे. मुंबईच्या CSMT स्थानकात आता एअरपोर्ट्सच्या धर्तीवर मध्य रेल्वेचं नवं प्रशस्त Namah LOUNGE! कॅफे सर्व्हिस ते ट्रॅव्हल कीट मिळतात 'या' सेवा!

माथेरान मिनी ट्रेन वेळापत्रक

आगामी दिवाळी, ख्रिस्मसचा सुट्टीचा काळ पाहता मुंबई, पुणे येथून अनेक जण बाहेर पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता माथेरान मधील पर्यटन पुन्हा खुलं करण्यासाठी प्रशासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनची शिथिलता देण्यात सुरूवात केली आहे.