Central Railway Ac Local: गारेगार रेल्वेमुळे विधिमंडळात वातावरण गरम, जितेंद्र आव्हाड यांनी दिला गंभीर इशारा, एसी लोकल पुन्हा चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एसी लोकलच्या (Mumbai AC Local) मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत.

AC local trains (Photo Credit: PTI)

Mumbai AC Local: मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या वातानुकुलीत मुंबई लोकल (Mumbai AC Local) सेवेबाबत आता प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या असून आमचा एसी लोकल सेवेला विरोध नाही. परंतू, गर्दीचे व्यवस्तापण करावे अशी मागणी या संघटना करत आहे. दरम्यान, वातानुकुलीत मुंबई लोकल सेवेचे पडसाद आता राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एसी लोकलच्या (Mumbai AC Local) मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात इशाराच दिला की, एसी लोकलमुळे निर्माण होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय वेळीच विचारात न घेतल्यास आगामी काळात स्टेशन्सवर आग लागेल. प्रवाशांमधून एसी लोकलबाबत प्रचंड उद्रेक आहे. एक तर एसी लोकलचे तिकट दर चांगलेच महाग आहेत. ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी आहे. दुसरे असे की, एक लोकल एकाच वेळी जवळपास चार ते पाच हजार प्रवाशांना घेऊन प्रवास करते. एसी लोकल जेव्हा फलाटाला लागते तेव्हा त्यात सरासरी केवळ एक हजार लोकच चढतात. अशा स्थितीत फलाटावर राहणाऱ्या उर्वरीत ती ते चार हजार लोकांचे काय करायचे? या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे? या प्रश्नाचे कोणतेच उत्तर रेल्वे देत नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. (हेही वाचा, Mumbai AC Local Train: एसी लोकलमुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप; 5.22 ची साधारण लोकल ठेऊन एसी गाडी रद्द करण्याची मागणी (Watch))

पाठिमागील काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रवाशांनी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात आक्रमक होत आंदोलन केले होते. हे आंदोलन मुंबई मध्य रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या वातानुकुलीत म्हणजेच एसी लोकल गाड्यांविरोधात होते. या वेळी आक्रमक प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल बराच काळ थांबवून ठेवली. ही एसी लोकल ज्या वेळी सुटायची त्याच वेळी यापूर्वी आगोदर नियमीत सुटणारी साधी लोकल असायची. या लोकलमधून लोक प्रवास करत असत. मात्र, त्याच वेळी एसी लोकल सुरु केल्याने अनेकांची गैरसोय झाली. परिणामी प्रवासी आक्रमक झाले त्यांनी आंदोलन केले. याच आंदोलनाचा धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात सूचक भाष्य केले. दरम्यान, केवळ कळवाच नव्हे तर बदलापूर आणि इतरही अनेक ठिकाणी प्रवाशांनी आंदोलन केले.