Mumbai Mega Block | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 15 जून 2025 रोजी उपनगरी रेल्वेमार्गावर महत्त्वाचे देखभाल व अभियांत्रिकी काम हाती घेण्यात येणार असल्याने मेगा ब्लॉक (Central Railway Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आवश्यक अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांना सुलभ करण्यासाठी हा ब्लॉक राबविण्यात येत आहे. या कामांमुळे काही मार्गांवर लोकल ट्रेन सेवा प्रभावित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि मुंबईबाहेरुन विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे वेळापत्रक जाणून घेऊनच प्रवास सुरु करणे महत्त्वाचे आहे.

प्रभावित सेवा आणि वेळा

  • सीएसएमटी मुंबई - विद्याविहार (अप आणि डाऊन स्लो लाईन्स)
  • ब्लॉक कालावधी: 10:55 AM ते 3:55 PM

मध्य रेल्वे मार्गावरुन सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान डाउन फास्ट लाईनवरून धावतील. या गाड्या भायकळा (Byculla), परळ (Parel), दादार (Dadar), माटूंगा (Matunga), शिव (Sion), कुर्ला (Kurla) येथे थांबतील आणि नंतर विद्याविहार येथे डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील. (हेही वाचा, Ghatkopar Railway Station Accident: घाटकोपर रेल्वे स्थानकावर भीषण अपघात, 50 वर्षांच्या प्रवाशाचा मृत्यू)

घाटकोपरहून सकाळी 10:19 ते दुपारी 3:52 दरम्यान सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

  • पनवेल - वाशी (हार्बर मार्ग)
  • ब्लॉक कालावधी: सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 (पोर्ट लाईन वगळून)

पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 दरम्यान सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा या कालावधीत रद्द राहतील.  (हेही वाचा, AC Locals With Auto Doors For Mumbai: भाडेवाड न करता मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

ट्रान्स-हार्बर लाईन सेवा

सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 दरम्यान पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या अप सेवा आणि सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 दरम्यान ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या डाउन सेवाही मेगा ब्लॉक दरम्यान रद्द केल्या जातील.

पर्यायी व्यवस्था

प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायोजना खालीलप्रमाणे:

  • ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.
  • ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहतील.
  • पोर्ट लाईन सेवा त्यांच्या सामान्य वेळापत्रकानुसार चालतील.

प्रवाशांना सूचना

नियोजित मेगा ब्लॉक सेवा सुरक्षेसाठी आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी अत्यावश्यक आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि गैरसोयीबद्दल क्षमस्व असे आवाहन केले आहे. प्रवाशांनी स्वतःचा प्रवास नियोजित करताना या वेळा आणि सेवा बदलांचा विचार करावा व अधिकृत माध्यमांतून वेळोवेळी माहिती तपासावी.