मे महिन्यात होणाऱ्या देशाच्या जनगणनेसाठी शिक्षकांच्या सुट्ट्या होणार रद्द
त्यामुळे जनगणनेचा सर्वे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणूका करण्यात येणार असल्याने त्यांच्या मे महिन्याच्या सुट्ट्या रद्द होणार आहे.
येत्या मे महिन्यात देशाची जनगणना होणार आहे. त्यामुळे जनगणनेचा सर्वे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणूका करण्यात येणार असल्याने त्यांच्या मे महिन्याच्या सुट्ट्या रद्द होणार आहे. भारतात देशाची जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. त्यामुळे पिंपरी चिंचवड येथील जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षक अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्याबाबत पत्र दिले आहे. परंतु शिक्षकांच्या मे महिन्याच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा येणार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हा निर्णय पाठी घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे.
पुढील वर्षाच्या म्हणजेच 2021 साठी जनगणनेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे ही कामे मे महिन्याच्या सुरुवाती पासून ते 15 जून पर्यंत सुरु राहणार आहे. याच कारणास्तव शिक्षकांच्या सुट्ट्यांवर गदा येणार आहे. तसेच जनगणनेची काम अन्य कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जनगणनेच्या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षकांसह मुख्यध्यापिका यांना मुख्यालय सोडून देऊ नये अशी सुचना जनगणना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.(2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर)
तर मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीत जनगणना करणे आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचे काम यांच्यामुळे अधिक ताण येणार असल्याचे शिक्षकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच हा निर्णय मागे घ्यावा अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेकडून करण्यात येत आहे.