मुंबई: सेलेब्रिटी महिला डॉक्टरने पेशंट महिलेचा नग्नावस्थेत व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल, नवोदित मॉडेलचा आरोप
मुंबईतील एका सेलेब्रिटी त्वचाविकार तज्ञाने क्लिनिक मध्ये उपचारासाठी आलेल्या मॉडलचा नग्न व्हिडीओ काढून त्यानंतर तिला धमकावल्याची तक्रार ओशिवरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे
मुंबईतील एका त्वचाविकाराच्या (Dermatologist) सेलेब्रिटी महिला डॉक्टरने क्लिनिक मध्ये उपचारासाठी आलेल्या मॉडेलचा नग्न व्हिडीओ (Naked Video) काढून त्यानंतर तिला धमकावल्याची तक्रार ओशिवरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. मुंबई मिरर च्या वृत्तानुसार ही नवोदित मॉडेल उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहत असून 24 जून ला लोखंडवाला (Lokhandwala) येथे स्थित या प्रसिद्ध सेलेब्रिटी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये ती उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरने उपचाराच्या दरम्यान लपून तिचा नग्नावस्थेत व्हिडीओ काढला आणि त्यावरून नंतर तिला धमकवायला सुरुवात केली अशी तक्रार संबंधित मॉडलने स्वतः पोलिसांकडे केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट साठी मुंबईतील या प्रसिद्ध त्वचाविकारतज्ञ् डॉक्टरच्या दवाखान्यात गेली होती, त्यावेळी तीन डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली होती, मात्र ज्या खोलीत हे उपचार सुरु होते त्याच्या स्लॅबवर काही कॅमेरे लपवलेले होते, प्रथमदर्शनी हे कॅमेरे म्हणजे एखाद्या स्मोक डिटेक्टर सारखे भासत होते मात्र याचा संशय आल्याने तिने या कॅमेरांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला. ही महिला घरी गेल्यावर रात्री उशिरा या डॉक्टर्सपैकी एकाने तिला फोन करून धमकवायला सुरुवात केली. यानंतर तिने या घटनेची माहिती देत पोलिसांकडे डॉक्टरांविरोधी रीतसर तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरांच्या विरुद्ध महिलेच्या प्रतिष्ठेला डागाळण्याचा प्रयत्न करून धमकावल्याची तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित डॉक्टरांची कसून चौकशी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.