Rajasthan Caste Survey: 'राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना', मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असताना याबाबत घोषणा केली आहे.

Caste Wise Census | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Caste Wise Census In Rajasthan: राजस्थान जातीनिहाय जनगणना करणारे राज्यातील दुसरे राज्य ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असताना याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे बिहार राज्यापाठोपाठ राजस्थानचा उल्लेख केला जाऊ शकतो. राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीची (RPCC) एक बैठक पक्षाच्या वॉर रुममध्ये पार पडली. या बैठकीत ही घोषणा करण्यात आल्याचे समजते. गेहलोत यांच्याशिवाय या बैठकीला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा, आरपीसीसी अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा आणि इतर नेते उपस्थित होते. गहलोत यांनी बैठकीनंतर शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, ''राजस्थान सरकार बिहारमध्ये झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणे जात सर्वेक्षणही करणार आहे. बिहारमध्ये झालेल्या जातनीहाय जनगणनेची देशभर चर्चा आहे. देशातील विविध समूह, आणि राज्यांकडूनही अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी पुढे रेटली जात आहे. छोट्या-छोट्या आणि मागास समूहांना विकासाच्या प्रमूख प्रवाहात आणण्यासाठी ही जनगणना अतिशय महत्त्वाची ठरेल असे अभ्यासकांना वाटते. अर्थात, हे पाऊल अनेक राजकीय पक्षांसाठी गैरसोयीचेही ठरणार आहे.

गहलोत यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून जातीनिहाय जनगणना ही संकल्पाना पुढे आली आहे. प्रत्येक समूहाला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत हिस्सा मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही आम्ही ठरवले आहे की पक्षाचा जनादेश लक्षात घेऊन, राजस्थान सरकारने ही मोहीम जाहीर करावी.

देशामध्ये अनेक जाती, जमाती, समूह आहेत. विविध जातीधर्माचे लोक राहतात. वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यामुळे कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याबाबत अधिकृत माहिती मिळणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांच्यासाठी आपण काय योजना आखल्या आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो. तसेच, त्यांच्यासाठी आवश्यक योजनाही आपण तयार करु शकतो. दरम्यान, या बैठकीत जाती-आधारित सर्वेक्षणाव्यतिरिक्त ईस्टर्न राजस्थान कालवा प्रकल्प (ईआरसीपी) मुद्द्यावरही चर्चा झाली, असे रंधवा म्हणाले.

दरम्यान, 13 जिल्ह्यांच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणार्‍या ERCP ला राष्ट्रीय प्रकल्प दर्जा मिळावा, या मागणीसाठी काँग्रेसने पूर्व राजस्थानमध्ये पाच दिवसांची यात्रा काढण्याची योजना आखली होती. मात्र, नुकतीच ती स्थगित करण्यात आली. राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष डोतासरा यांनी शुक्रवारी सांगितले की, सोमवारी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात ईआरसीपी मुद्द्यावर यात्रेच्या तारखा निश्चित केल्या जातील. 'काम दिल से, काँग्रेस फिर से', असा काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा नारा असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, 2023 ची राजस्थान विधानसभेची निवडणूक या वर्षी डिसेंबरमध्ये किंवा त्यापूर्वी होण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif