राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल झाले पाहिजेत- रणजित सावरकर

यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी आक्रमक भुमिका घेऊन काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Ranjeet Savarkar (Photo Credit: ANI)

वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखान असेलेली पुस्तिका काँग्रेस सेवा दलाने वितरित केली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी आक्रमक भुमिका घेऊन काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) कार्यकर्त्यांवर खटले दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी रणजीत सावरकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु, आज त्यांची भेट होऊ शकली नाही. यावर रणजीत सावरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख असलेली पुस्तिका काँग्रेस सेवा दलाने वितरित केली  आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख आहेत. त्यावरुन नवा वाद समोर आला आहे. या वादात वीर सावरकर यांचे नातू यांनी उडी घेत काँग्रेस दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. "आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. काँग्रेस पक्षाची ही बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार? याचे उत्तर आम्हाला हवे आहे", असे पश्नही रणजीत सावरकर यांनी त्यावेळी उपस्थित केले आहे. हे देखील वाचा- केंद्र सरकारच्या कामगाराविरोधी धोरणांच्या निषेधार्थ 8 जानेवारीला कामगार संघटनांचा देशव्यापी संपाची हाक

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, रणजीत सावरकर म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आलो होतो. त्यांच्या भेटीसाठी मी त्यांना अनेक विनंत्या केल्या, मात्र आज त्यांची भेट होऊ शकली नाही. सावरकरांच्या सन्मानाबाबत माझ्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे 1 मिनिटही वेळ नव्हता. त्यामुळे मी खूपच निराश झालो आहे. हा एक प्रकारे सावरकरांचा अपमानच आहे, असेही रणजीत सावरकर म्हणाले आहेत. याआधीही राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधानानंतर या वादाने पेट घेतल्याचे समोर येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif