Accident On Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि टँकरची धडक; 2 ठार

दोघेही पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी येथील ब्राम्हणवाडी येथील रहिवासी आहेत. या धडकेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून कारमधील दोन्ही प्रवासी जागीच ठार झाले. अपघातातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले.

Accident (PC - File Photo)

Accident On Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) कार आणि टँकरची जोरदार धडक झाली. तलासरी तालुक्यात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरची कारला धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी जवळ 23 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता गुजरातकडे जाणारी भरधाव कार दुभाजकावर आदळली आणि नंतर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरला धडकली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या अपघातात हरेश लक्ष्मण पडवी (30) आणि कृष्णा रामाजी कडू (25) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दुंदलवाडी येथील ब्राम्हणवाडी येथील रहिवासी आहेत. या धडकेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून कारमधील दोन्ही प्रवासी जागीच ठार झाले. अपघातातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. (हेही वाचा -Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 5 दिवस 'या' भागांत मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट)

दरम्यान, आज उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर 68 माईलस्टोनजवळ इनोव्हा कार तेलाच्या टँकरवर आदळल्याने एका कुटुंबातील चौघांसह सात जणांचा मृत्यू झाला. यमुना एक्स्प्रेस वेच्या पलीकडे एक वेगवान तेलाचा टँकर द्रुतगती मार्गावरून जात असताना टायर फुटल्याने तो पलटी झाला. या टँकरला आग्राहून येणारी एक इनोव्हा कार धडकली. यात कारमधील सात जण जागीच ठार झाले.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यूपीआयडीए बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर पलटलेल्या टँकरमधून तेल गळती झाल्याचा इशारा एक्स्प्रेस वेवर देण्यात आला, परिणामी यमुना द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाच्या मदतीने टँकर हटवण्यात आले. गळती झालेल्या तेलावर पाणी फवारल्यानंतर वाहतुकीस परवानगी देण्यात आली. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) श्रीश चंद्र यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृतांच्या कुटुंबीयांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.