Badlapur School Case: अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी बदलापूर बंदची हाक; रस्त्यावर पालक आणि नागरिकांचा ठिय्या
त्यानंतर आज संपूर्ण बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मध्ये रेल्वेच्या रुळांवर बसून नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं. पालक आणि नागरिक शाळेबाहेर ठिय्या दिला.
Badlapur School Case: बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत सोमवारी दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगीक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर आज संपूर्ण बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी पीडित मुलींचे संतप्त पालक आणि शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी हजारोच्या संख्येने शाळे समोर जमत निदर्शने करत घोषणाबाजी केली. दरम्यान, याप्रकरणी बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. मध्ये रेल्वेच्या रुळांवर बसून नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं. तर सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. (हेही वाचा:Badlapur: बदलापूरमध्ये शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा शाळेच्या गेटवर मोर्चा )
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व पालकांकडून करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे मुंबईकरांचा मोठा खोळंबा झाला. मध्ये रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. बदलापूरमध्ये सर्व शाळा, महाविद्यालये दुकान, कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. बदलापूरमधील नामांकीत शाळेत अशा घटना घडत असल्याने आणि पोलिसांकडून शाळेवर दिरंगाईने झालेल्या कारवाईमुळे स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनावर टिकीची झोड उठवली जात आहे. (हेही वाचा:Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हायरल पोस्टनंतर खळबळ )
आपल्या मुलीबरोबर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समजताच पालकांनी पोलीस ठाणे गाठत तक्री नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पालकांना रात्री उशीरापर्यंत ताठकळत ठेवलं होतं. सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी मात्र, बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे.
चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे गांभीर्य न ओळखता त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून येत आहे. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत आहेत. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे.