Cotton Season 2019-20: यंदाच्या हंगामात 354.5 लाख गाठी कापूस उत्पन्न शक्य - सीएआय

कृषी मंत्रालयाने या काळात देशात कापसाचे उत्पादन हे 322.7 लाख गाठी इतके राहील असा अंदाज वर्तवला आहे. सुरु असलेल्या वर्षाआधीचे म्हणजेच सन 2018-19 या काळातील कापसाच्या उत्त्पन्नाचे आकडे पाहिले तर, हे उत्पन्न 287.1 लाख इतके राहीले होते.

Cotton | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे: यंदाच्या हंगामात (2019-20) कापसाचे उत्पन्न सुमारे 354.50 लाख गाठी इतके होईल, असा अंदाज कॉटन असोशिएशन ऑफ इंडिया (Cotton Association of India) ने व्यक्त केला आहे. सीएआयने (CAI) या अंदाजात 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेला कापूस हंगाम 2019-20 (Cotton Season 2019-20) गृहीत धरला आहे. कापसाची एक गाठ ही 170 किलोग्रॅम इतक्या वजनाची असते.

कापसाच्या उत्पादनाबाबत सीएआयने वर्तवलेले अंदाजाचे आकडे हे कृषी मंत्रालयाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा बरेच मोठे आहेत. कृषी मंत्रालयाने या काळात देशात कापसाचे उत्पादन हे 322.7 लाख गाठी इतके राहील असा अंदाज वर्तवला आहे. सुरु असलेल्या वर्षाआधीचे म्हणजेच सन 2018-19 या काळातील कापसाच्या उत्त्पन्नाचे आकडे पाहिले तर, हे उत्पन्न 287.1 लाख इतके राहीले होते.

सीआयएने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत कपासाचे एकूण उत्पादन हे 234.89 लाख गाठी इतके राहीले आहे. यात 31 जानेवारी 2020 पर्यंत 192.89 लाख गाठी इतका कापसाचा पुरवठा राहीला. तर 10 लाख गाठी कापूस आयात करण्यात आला. सीआयएने विद्यमान हंगामात कापसाचा साठा 32 लाख गाठी इतका राहील असा अंदाज वर्तवला आहे. या आधी हाच साठा 23.50 लाख टन इतका राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. (हेही वाचा, China Chang'e 4 Mission : आता चक्क चंद्रावर होणार कापूस आणि बटाट्याची शेती; चीनी संशोधकांच्या प्रयत्नांना यश)

सीआयएने वार्षीक ताळेबंदात दर्शवलेल्या अंदाजानुसार सुरु असलेल्या कापूस हंगामाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कापसाचा एकूण पुरवठा हा 411.50 लाख गाठी इतका राहू शकेल. कापूस उत्पादनाच्या एकून हंगामी वर्षात म्हणजे 30 सप्टेंबर 2020 पर्यंत देशी वापर (Domestic consumption) 331 लाख गाठी इतके राहू शकेल. वापराचा हा आकडा 28 नोव्हेंबर 2019 च्या कापूस सल्लागार बोर्डाच्या अधिकृत अंदाजाच्या आसपासच आहे.

सीएआयने सुरु असलेल्या हंगामात कापूस निर्यातीचा अंदाज हा 42 लाख गाठी इतका ठेवला आहे. हा अंदाज गेल्या वर्षीच्या अंदाजाच्या एकूण अंदाजाच्या आसपासच आहे. हंगामाच्या शेवटी एकूण अंदाजाचा आकडा हा 38.50 लाख इतका आहे. जो या आधीच्या तुलनेत 8.50 लाख गाठ इतका आहे.