Byculla Rape and Blackmailing Case: Snapchat वरील मैत्री अल्पवयीन मुलीला पडली महागात; बलात्कार करून न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी, 3 जणांना अटक
तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ऑनलाईन फोटो शेअर केले जातील अशी धमकी दिली होती.
भायखळा पोलिसांनी (Byculla Police), सोमवार 23 सप्टेंबर दिवशी 17 वर्षीय मुलाला आणि त्याच्या 2 मित्रांना 15 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार (Rape) 3 महिन्यांपूर्वीची घटना आहे. Snapchat वर पीडीतेची आरोपी मुलांशी ओळख झाली होती. दरम्यान तिला तोंड बंद ठेवण्यासाठी तिचे नग्न फोटोज शेअर केले जातील याची धमकी दिली होती.
पीडीत मुलीच्या घरातून अनेक मौल्यवान वस्तू आणि पैसे गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर हा बलात्काराचा प्रकार प्रकाशझोकात आला. Hindustan Times,च्या वृत्तानुसार 17 वर्षीय मुलांनी पीडित मुलीसोबत मे महिन्यात स्नॅपचॅट या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर मैत्री केली होती. आरोपी मुलाने या मुलीला घरी बोलावले आणि तेथेच तिच्यावर बलात्कार झाला.
प्राथमिक तपासामध्ये आरोपी मुलांनी त्यांच्या मैत्रीच्या काळामध्ये तिचे काही नग्न फोटोज काढले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार तिच्यावर दोन वेळेस बलात्कार झाला होता. बलात्काराच्या तिसर्या प्रकारानंतर अल्पवयीन आरोपीने त्याच्या 19 आणि 22 वर्षीय अन्य दोन मित्रांसोबत तिचे न्यूड फोटो शेअर केले. त्या दोन मित्रांनीही तिच्यावर बलात्कार केला. नक्की वाचा: Mumbai Rape and Kidnapping Case: सोशल मीडीयात मैत्री करून 21 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या .
मे ते जुलै दरम्यान अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तिचे फोटोज शेअर करण्याची धमकी दिली. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ऑनलाईन फोटो शेअर केले जातील अशी धमकी दिली होती. तिचं ब्लॅकमेलिंग होत असल्याने दहावीच्या वर्गातील मुलांनी तिच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू देखील उकळल्या.
मुलीला आईने जबाब विचारल्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलं चांगल्या घरातील आहेत. Bhartiya Nyaya Sanhita, 2023 च्या विविध कलमांखाली आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.