Busiest Routes in India: भारतातील टॉप 10 सर्वात व्यस्त मार्गांमध्ये मुंबई-पुणे मार्गाचा समावेश; Weenend च्या आरक्षणांमध्ये 20% वाढ- redBus Study
याद्वारे एकूण 100 इलेक्ट्रिक शिवनेरी बसेस मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर धावतील.
मुंबई-पुणे महामार्ग (Mumbai-Pune Expressway) हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख आणि मोठ्या शहरांना जोडणारा व्यस्त महामार्ग आहे. दिवसभरात लाखो वाहने या महामार्गावरून प्रवास करत असतात. आता ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्म रेडबस (RedBus) नुसार, मुंबई-पुणे मार्ग भारतातील 1 मे पर्यंत मोठ्या वीकेंडसाठी (Long Weekend) देशातील टॉप 10 सर्वात व्यस्त रहदारी मार्गांपैकी एक आहे. रेडबसच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 2022 च्या तुलनेत मुंबई-पुणे मार्गावरील आठवड्याच्या शेवटी आरक्षणांमध्ये 20% वाढ झाली आहे. TOI ने हा अहवाल दिला.
देशातील इतर व्यस्त बस मार्गांमध्ये दिल्ली–मनाली, लखनौ–दिल्ली, इंदूर–भोपाळ, गुवाहाटी–तेजपूर, दिब्रुगढ–गुवाहाटी, दुर्गापूर–कोलकाता, बेंगळुरू–चेन्नई, विजयवाडा-हैदराबाद यांचा समावेश आहे.
लाँग वीकेंडच्या (शानिवार-रविवार-सोमवार) प्रवासाची सर्वाधिक मागणी बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यान होती, असे अभ्यासात दिसून आले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही प्रमुख राज्ये आहेत जिथे प्रवासाला जास्त मागणी आहे.
रेडबस अभ्यासात असे नमूद केले आहे की, 3,500 पेक्षा जास्त खाजगी बस ऑपरेटर आणि 17 राज्य रस्ते परिवहन महामंडळांनी संपूर्ण भारतात एकूण 52,000 पेक्षा जास्त बस सेवा ऑफर केल्या आहेत. लाँग वीकेंडमध्ये अंदाजे 80 लाख प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. (हेही वाचा: Most Traffic Congested City in The World: पुणे ठरलं जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर - रिपोर्ट)
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस सेवेचा शुभारंभ केला. याद्वारे एकूण 100 इलेक्ट्रिक शिवनेरी बसेस मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर धावतील. शिंदे यांनी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असल्याचे सांगून जास्तीत जास्त दर्जेदार व लोकाभिमुख सेवा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. शिंदे यांनी दिवंगत बाळ ठाकरे यांच्या नावाने बसस्थानकांची स्वच्छता आणि सुशोभीकरणाची मोहीमही सुरू केली.