Theft at Marathi Director Swapna Joshi's House: मराठी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये चोरी; पाईपच्या सहाय्याने चोर सहाव्या मजल्यावर पोहोचला (Watch Video)

त्यानंतर स्वप्ना जोशी स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या पर्समधले 6,000 रुपये चोराने चोरून नेले. या प्रकरणी स्वप्ना जोशी यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Photo Credit- X

Theft at Marathi Director Swapna Joshi's House: मराठी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी(Swapna Joshi) यांच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार, चोराने संपूर्ण घरात सामानाची तपासणी (Theft at Marathi Director House)केली. त्यानंतर चोराने 6,000 रुपये चोरून नेले. घरात चोरी झाल्याची घटना समजताच स्वप्ना जोशी यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. सध्या पोलीस त्याद्वारे चोरचा तपास करत आहेत. (CSMT Bathroom Theft: मुंबई च्या सीएसएमटी स्टेशन वर 1.22 लाखांच्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी 23 वर्षीय तरूण अटकेत; पोलिसांनी रंगेहात पकडलं)

स्वप्ना जोशी यांचा सहाव्या मजल्यावर थ्री बीएचके फ्लॅटमध्ये आहे. तेथे त्या कुटुंबासह राहतात. चोरीची घटना रविवारी पहाटे 3.10 ते 3.30 च्या दरम्यान झाली. चोरटा पाईच्या सहाय्याने सहाव्या मजल्याव पोहोचला होता. त्यानंतर त्याने खिडकी उघडून हॉलमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण घराची तपासणी केली. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला. त्यात तो हॉल, किचनमध्ये फिरताना दिसतो. त्याशिवाय, बेडरूमचा दरवाजा उघडताना आणि डोकावून पाहताना दिसतो.(EVM Machine Theft: ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिटही बेपत्ता; पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील घटना)

चोर पाईच्या सहाय्याने सहाव्या मजल्याव पोहोचला

एका रूममध्ये स्वप्ना जोशी यांची वृद्ध आई बेडवर झोपली असते. त्यानंतर तो पुढच्या बेडरूममध्ये प्रवेश करतो, जिथे दिग्दर्शिका झोपली होती, परंतु तिच्या खोलीत कुत्रा दिसल्याने तो त्या रूममध्ये जात नाही. त्यानंतर तो स्वयंपाकघरात जातो. तो शेवटी तिसऱ्या बेडरूममध्ये जातो. तिथे स्वप्ना जोशी यांची मुलगी आणि जावई झोपलेले असतात. तिथे, तो पर्समधून तो सहा हजार रुपये काढतो. मात्र, त्यानंतप दुसरी मांडर ओरडल्याने स्वप्ना जोशी यांचे जावई जागे होतात. तेव्हा ते चोर-चोर करून ओरडतात. मात्र, त्यानंतर चोर आलेल्या मार्गाने पळून जातो.