बुलढाणा: Tik Tok चा व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क 200 फूट उंच पूलावरुन पुर आलेल्या नदीत उडी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका तरुणाने टिक-टॉकचा व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क 200 फूट उंच पूलावरुन पुर आलेल्या नदीत उडी मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियामधील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले अॅप टिक-टॉक (Tik Tok) याचा वापर सध्या वाढत चालला आहे. तसेच टिक-टॉक अॅपचे देशात करोडोपेक्षा अधिक युजर्स आहेत. मात्र टिक-टॉकच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यासाठी केलेले स्टंट जीवावर बेतण्याची शक्यता असते. तर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका तरुणाने टिक-टॉकचा व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क 200 फूट उंच पूलावरुन पुर आलेल्या नदीत उडी मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
शुक्रवारी पूर्णा नदीला मोठा पूर आल्याने त्याचे पाणी अधिक वेगाने वाहत होते. अशाच परिस्थितीत एका तरुणाने चक्क टिक-टॉकचा व्हिडिओ बनवण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र तरुणाला पोहता येत होते म्हणून त्याने नदीच्या काठाला विसावा घेतल्याने दिसून आले.(मुरबाड: Tik Tok चा व्हिडिओ बनवण्यासाठी केलेला बाईक स्टंट तरुणाच्या अंगलट, डोक्याला गंभीर दुखापत)
मात्र अशा पद्धतीचे थरारक स्टंट जीवघेणा ठरु शकतो. यापूर्वीसुद्धा पूर्णा नदी येथे असलेल्या पूलावरुन स्टंट करण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी मुरबाड येथील एका तरुणाने बाइकवरुन स्टंट करत टिक-टॉक व्हिडिओ बनवण्याचा प्रकार समोर आला होता. मात्र त्यावेळी तरुणाची बाइक स्टंट करताना अचानक घसरल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती.