Building Collapses in Mahad: रायगड जिल्ह्यात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी NDRF च्या पथकाने शक्य तेवढी मदत करावी- अमित शहा

ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड येथे इमारत कोसळली (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे एक 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे  (NDRF) पथक घटनास्थळी पोहचले आहेत. याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीआरफच्या महासंचलकांशी बातचीत करुन शक्य तेवढी मदत करावी असे म्हटले आहे. त्याचसोबत एनडीआरफचे पथक कार्यरत असून बचाव कार्य लवकरच पार पडेल असे ही अमित शहा यांनी ट्वीट करत म्हटले आहे. तसेच नागरिकांची सुखरुप सुटका होण्यासाठी प्रार्थना सुद्धा त्यांनी केल्या आहेत.

रिपोर्टनुसार, पाच मजली इमारतीत जवळजवळ 45 ते 50 फ्लॅट होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत होते. या दुर्घटनेनंतर 22 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याचसोबत जखमी नागरिकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचसोबत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.(Mahad Building Collapse: रायगड जिल्ह्यातील महाड येथे 5 मजली इमारत कोसळली; 15 लोकांना वाचवण्यात यश, 200 हून अधिक लोक अडकल्याची भीती Video)

दरम्यान, मुंबईतील फोर्ट येथील परिसरात सुद्धा सहा मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 10 जणांचा बळी गेला होता. त्याचसोबत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत.