Vasai Murder Case: ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रेयसीची निर्घृण हत्या, वसईतील थरकाप उडवणारी घटना

तरुणीवर सपासप वार करत हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे

Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Vasai Murder Case: वसईत (Vasai) एका तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या (Murder) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तरुणीवर सपासप वार करत हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत तरुणीचे नुकतंच ब्रेकअप झालं होते. त्याचा राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीला संपवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघे ही रिलेशनशिपमध्ये होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- जादूटोणा केल्याच्या संशयामधून जोडप्याला मारहाण)

मिड डे या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या वृत्तानुसार, ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. धारधार शस्त्राने (स्पॅनरने) तरुणीच्या डोक्यावर आणि छातीवर सपासप वार केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी रस्त्याच्या मधोमध तरुणीची निर्घृण हत्या केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. उपस्थितांपैकी कोणीही हस्तक्षेप करून हल्ला थांबविण्याचे धाडस करत नाही. पीडित महिलेला वाचवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. काही जण व्हिडिओ शुट करताना दिसत आहे.

तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तीचा जागीच मृत्यू होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात  एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर आणि पीडितेची अद्याप ओळख पटली नाही. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.