आज ब्राम्हण समाजाचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर समाज, मुस्लिम समाज यांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. त्यामध्ये आता समस्त ब्राम्हण समाजाकडूनही (Samast Brahmin Samaj) आरक्षणाची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रभर आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाला (Maratha Community) राज्य सरकारने 16% आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर समाज, मुस्लिम समाज यांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. त्यामध्ये आता समस्त ब्राम्हण समाजाकडूनही (Samast Brahmin Samaj) आरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मंगळवारी (22 जानेवारी) रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे.
मोदी सरकारने नुकतेच मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण लागू केल्याने आता समस्त ब्राम्हण समाजाकडून ही आरक्षण लागू करा अशी मागणी केली जात आहे. या आंदोलनसाठी आझाद मैदानावर ब्राम्हण समाजातील लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. (हेही वाचा-मराठा समाजानंतर आता महाराष्ट्रामध्ये ब्राम्हण समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटणार , 22 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन)
समस्त ब्राम्हण समाजाच्या मागण्या काय आहेत ?
- ब्राम्हण समाजाचील पुरोहितांना प्रतीमहिना 5000 रुपये मानधन देऊ करणे. त्याचसोबत विविध मंदिरामध्ये नियुक्ती करावी.
- आय टी अॅक्ट 2005 मधील कलम 66 इ नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांना दखलपात्र गुन्हा समजावा.
-ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे.
- KG ते PG पर्यंचे शिक्षण समाजातील विद्यार्थ्यांना मोफत देणे.
-छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची उभारणी लवकरात लवकर करावी.
-स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
-समस्त ब्राम्हण समाजाच्या मते पुजारी असणार्या ब्राम्हणांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. महाराष्ट्रात अशा ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणात आहे.
-ब्राम्हण समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खास Financial Developmental Board स्थापन करावे अशीदेखील मागणी आहे.
-डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थेमध्य हे आरक्षण लागू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय आरक्षण 68% आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी मोदी सरकारने SC/ST लोकांसाठी नवीन कायदा बनवला, त्यावर भाजपचे कोअर वोटर अशी ओळख असलेले सवर्ण नाराज होते. त्याचा तोटा भाजपाला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हे मोठे पाऊल उचलले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)