Anil Deshmukh यांचा अखेर 1 वर्ष, 1 महिना 26 दिवसांनी तुरूंगातून सुटकेचा मार्ग मोकळा; आर्थिक घोटाळ्याप्रकरणी होते अटकेत

1 वर्ष, 1 महिना आणि 26 दिवसांनंतर अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा सुटकेचा मार्ग अखेर मोळळा झाला आहे. 1 वर्ष, 1 महिना आणि 26 दिवसांनंतर अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने दिलेल्या जामीनाला सीबीआयने (CBI) रोखल्याने आज पुन्हा स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सध्या अनिल देशमुख हे मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये आहेत. तेथून उद्या त्यांची सुटका होणार आहे. दरम्यान 12 डिसेंबर दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) 1 लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर झाला होता. त्याला सीबीआयने आव्हान दिले होते.

अनिल देशमुख हे यांना 1 नोव्हेंबर 2021ला अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नक्की वाचा: Money Laundering Case: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचे स्वीय सहाय्यक Sanjeev Palande यांना जामीन मंजूर; Bombay High Court चा दिलासा .

दरम्यान महाविकास आघाडी सरकार मध्ये अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह होते. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये देशमुख यांनी त्यांना दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.

अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. उद्या मोठ्या संख्येत त्यांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याचे म्हटलं आहे.