Fire Breaks Out at Jindal Company Nashik: नाशिक येथील जिंदाल कंपनीत बॉयलर स्फोट, मोठी आग भडकल्याने काही कर्मचारी जखमी
कंपनीतील बॉयलरचा स्फोट ( Boiler Explosion in Jindal Company) झाल्याने ही आग भडकल्याची (Fire Breaks Out at Nashik प्राथमिक माहिती आहे. नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज (1 जानेवारी 2023) साखील बॉयलरचा मोठा स्फोट झाला.
नाशिक येथील जिंदाल कंपनीला मोठी (Fire Breaks Out at Jindal Company Nashik आग लागली आहे. कंपनीतील बॉयलरचा स्फोट ( Boiler Explosion in Jindal Company) झाल्याने ही आग भडकल्याची (Fire Breaks Out at Nashik प्राथमिक माहिती आहे. नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज (1 जानेवारी 2023) साखील बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहितीची प्रतिक्षा आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचे लोटच्या लोट हवेत उसळत असल्याने परिसरात काळोखी पसरली आहे. आगीची तीव्रता भीषण असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर हालवण्यात आले आहे. अधिकचा तपशील अद्याप यायचा आहे.
ट्विट
दरम्यान, आगिचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या तरी आगीचे कारण शोधण्यापेक्षा आगिवर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.