Pravin Darekar: प्रविण दरेकर यांना सत्र न्यायालयाचा दिलासा, सोमावरपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश
बोगस मजुर नोंदणी (Bogus Labor Case) प्रकरणात प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिलासा दिला आहे. प्रविण दरेकर यांना सोमवारपर्यंत (21 मार्च) अटक करु नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
बोगस मजुर नोंदणी (Bogus Labor Case) प्रकरणात प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिलासा दिला आहे. प्रविण दरेकर यांना सोमवारपर्यंत (21 मार्च) अटक करु नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रविण दरेकर यांना तूर्तास तरी दिलासा मिळाल्याने त्यांच्यावरील अटकेची तलवार काही दिवस का होईना पुढे ढकलली गेली आहे प्रविण दरेकर यांनी बोगस मजूर प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करुन आपल्याला अटकेपासून संरक्षण द्यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने दरेकर यांची याचिका फेटाळून लावली. तसेच, हवे तर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा, असे म्हटले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार दरेकरांनी सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता.
मजूर असल्याचे भासवत प्रविण दरेकर यांनी मुंबै बँकेचे (Mumbai Bank) हजारो ठेविदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणुक केली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच आरोपावरुन आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे (AAP Dhananjay Shinde) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात आपल्याला अटक अथवा कठोर कारवाई होऊ नये अशी मागणी करत दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. (हेही वाचा, Pravin Darekar: मुंबै बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल)
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये (Mata Ramabai Ambedkar Marg Police Station) दरेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2022 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

