दादर च्या Kohinoor Square Parking Lot मधून Bastian Restaurant ला आलेल्या व्यावसायिकाची 80 लाखाची BMW Z4 चोरीला
गाडीचा मालक नंतर पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. सध्या सीसीटीव्ही फूटेज वरून गाडी चोरणार्याचा शोध सुरू आहे.
दादर च्या कोहिनूर स्क्वेअर (Kohinoor Square) मधील पार्किंग मधून 80 लाख किंमतीची BMW Z4 चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना रविवार 27 ऑक्टोबरच्या सकाळची आहे. दरम्यान कोहिनूर स्केवर मधील 48 व्या मजल्यावर असलेल्या Bastian - At the Top या रेस्टॉरंट मध्ये आला होता. दरम्यान हे रेस्टॉरंट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं आहे.
Hindustan Times,च्या रिपोर्टनुसार, BMW Z4,ही टू सीटर कंवर्टेबल कार Ruhan Firoz Khan या व्यावसायिकाची आहे. खान हे वांद्रे येथील कार्टर रोड वर राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मित्रांसोबत ते रविवारी 1 च्या सुमारास ते रेस्टॉरंट मध्ये आले होते. त्यांनी गाडीची चावी रेस्टॉरंटच्या व्हॅले पार्किंग साठी संबंधित व्यक्तीला दिली.
जेवणानंतर ते खाली आले बॅस्टिनच्या पार्किंग स्टाफला गाडी आणण्यासाठी सांगितलं तेव्हा त्यांना गाडी गायब असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी स्टाफला सीसीटीव्ही फूटेज तपासायला सांगितलं तेव्हा गाडी चोरली गेल्याचं त्यांना समजलं.
सीसीटीव्ही फूटेज नुसार एका अज्ञाताने ती गाडी उघडली आणि 2 च्या सुमारास चोरली. गाडीचा मालक नंतर पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. सध्या सीसीटीव्ही फूटेज वरून गाडी चोरणार्याचा शोध सुरू आहे.