Mumbai Local Update: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासात सवलत? BMC ने दिले 'हे' उत्तर

दरम्यान, आता मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या लोकल ट्रेन्स (Local Trains) कधी सुरु होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी लोकल संदर्भात अपडेट्स दिल्यानंतरही सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, लसीकरण होत असल्याने लोकल प्रवासाला मुभा मिळणार का? असा प्रश्न विचारला जात असताना आता मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

मुंबईमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 15 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरु आहे. या सवलती नेमक्या काय असतील याबाबत येत्या आठ दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले. तसंच मुंबईसोबतच मुंबई महानगर प्रदेशाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे या संपूर्ण भागात कोविडची स्थिती काय आहे, हे पाहून निर्णय घेण्यात येईल. मात्र हा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारचा आहे, हे देखील काकाणी यांनी स्पष्ट केले. (Mumbai Local Update: मुंबई लोकल सुरु करण्याबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या)

त्याचबरोबर तिसऱ्या लाटेसाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा सक्षम केल्या जात आहेत. त्यासोबतच नव्याने देखील सुविधा उभारल्या जात आहेत. या महिनाअखेरपर्यंत आणखी तीन जंबो कोविड सेंटर पूर्णत्वास येणार आहेत. तसंच बेड्सची संख्या वाढवणे, उपचारांबाबत गैरसोय होऊ नये यासाठी तयारी करणे आणि ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता यावर आम्ही भर देत आहोत. तिसऱ्या लाटेत पालिका प्रशासन कमी पडू येणे यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif