Curfew In Mumbai? मुंबईत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला पत्र
मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने (BMC) महाराष्ट्र सरकारला (State Government) लिहिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र जरी अनलॉकच्या (Unlock) टप्प्यात आला असला तरीही राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट अजून टळलेले नाही. मात्र या गोष्टीची दखल नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सोशल डिस्टंसिंग (Social Distancing), सतत मास्कचा वापर (Use Mask), वारंवार हात धुणे (Wash Hand) या सरकारच्या नियमांचे पालन देखील मुंबईतील अनेक भागांत होत नसल्याचे चित्र दिसत आहे.त्यात मुंबईतील अनेक पब आणि नाईट क्लबमुळे या नियमांची पालमल्ली होताना दिसत आहे. या सर्वांचा विचार करुन मुंबईमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात यावी अशी विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने (BMC) महाराष्ट्र सरकारला (State Government) लिहिले आहे.
अनलॉकच्या टप्प्यात हॉटेल्स, पब, नाइट क्लब सुरु झाली असली तरी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता ही रात्री साडे अकरानंतर बंद होणे अपेक्षित आहे. मात्र तस होताना दिसत नसल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- पुण्यात उद्या 'No Horn' मोहीम, एक दिवस हॉर्नला मिळणार पूर्ण विश्रांती
साथरोग कायदा 1897 लागू असल्याने एका ठिकाणी 50 हून अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी नाही. मात्र तरीही मुंबईतील पब, नाइट क्लब राजरोसपणे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात यावी अशी विनंती BMC ने महाराष्ट्र सरकारला पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या राज्यात काल 3824 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवीन 5008 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1747199 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71910 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.