COVID 19 In Mumbai: कोविडची सौम्य लक्षणं असणार्यांसाठी BMC पंचतारांकित हॉटेल्समध्ये Step Down Facilities सुरू करणार; जाणून घ्या हॉटेल्सची नावं, शुल्क किती असेल?
दक्षिण मुंबई मध्ये बॉम्बे हॉस्पिटल मरीन ड्राईव्हचे InterContinental हॉटेल वापरू शकेल तर HN Reliance Foundation Hospital साठी बीकेसीचे ट्रायडंट हॉटेल असेल. या स्टेप डाऊन फॅसिलीटीज मध्ये डॉक्टर तपासणीसाठी उपलब्ध असतील.
मुंबई मध्ये वाढता कोरोना रूग्णांचा आकडा हा भयावह असला तरीही मुंबई महानगरपालिका प्रशासन या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसून तयारी करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. आज बीएमसीने जसलोक हे संपूर्ण कोविड रूग्णांसाठी हॉस्पिटल समर्पित केल्याचं सांगितल्यानंतर शहरात काही 4 स्टार, 5 स्टार हॉटेल्स ही स्टेप डाऊन फॅसिलिटी सेंटर म्हणून खुली करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान ज्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये फार तातडीने 24 तास वैद्यकीय मदतीची गरज नाही अशांना स्टेप डाऊन फॅसिलिटी मध्ये हलवले जाणार आहे. या साठी वांद्रे आणि दक्षिण मुंबई परिसरातील काही हॉटेल्सची निवड झाल्याचं सांगण्यात आले आहे. Jaslok Hospital मुंबई मध्ये आता संपूर्ण COVID19 Hospital; वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे NESCO Jumbo centre, SevenHills Hospital मध्येही बेड वाढवणार; BMC ची माहिती.
पालिकेने स्टेप डाऊन फॅसिलिटी सुरू करण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गरजवंत कोविड 19 बाधित रूग्णांला हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार दिले जाऊ शकतील. त्यामुळेच आता ज्यांना कोविडची सौम्य लक्षणं आहेत आणि वैद्यकीय मदतीची गरज नाही अशांना स्टेप डाऊन सेंटरचा पर्याय दिला जाऊ शकतो.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण मुंबई मध्ये बॉम्बे हॉस्पिटल मरीन ड्राईव्हचे InterContinental हॉटेल वापरू शकेल तर HN Reliance Foundation Hospital साठी बीकेसीचे ट्रायडंट हॉटेल असेल. या स्टेप डाऊन फॅसिलीटीज मध्ये डॉक्टर तपासणीसाठी उपलब्ध असतील. खाजगी हॉस्पिटलच्या मदतीने प्रति दिवस 4000 रूपये एका व्यक्तीसाठी तर ट्वीन शेअरिंग रूम साठी 6000 रूपये आकारले जाऊ शकतात. हॉस्पिटल्सकडून याव्यतिरिक्त औषधांचा कहर्च, डॉक्टर व्हिझिट आणि अन्य खर्च आकारला जाऊ शकतो.
हेल्थ डिपार्टमेंटच्या गाईडलाईन नुसार, खाजगी हॉस्पिटलच्या मदतीने स्टेप डाऊन सेंटर देणार्या हॉटेल मध्ये 20 रूम्स असणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी रूग्णांना तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असते असे चित्र नाही असं निदर्शनास आले आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ अशाच रूग्णांना स्टेप डाऊन फॅसिलिटी मध्ये हलवले जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)